तळकोकण महाराष्ट्रातही मान्सून दाखल होणार! मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ७ जूननंतरच

0

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवस लागणार असून दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जूनपर्य़ंत दाखल होतो. यंदा मात्र यासाठी 4 ते 5 जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रळपासून मान्सूनची स्थिति पाहता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल, हे निश्चित होईल.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

या वर्षी 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. जूनमधे सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. केरळमध्ये ३ ते ४ जूननंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अरबी समुद्रात ७, ८ आणि ९ जूनदरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन १० ते १२ जूनदरम्यान होईल. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ७ जूननंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.