पुण्यातील रस्ते मोकळा श्वास घेतायंत; ATMS मुळे वाहतुक वेगाची 10.44 टक्क्यांनी वाढ तर कोंडी 53 टक्क्यांनी कमी

0
1

मुंबईनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी हा प्रशासनासमोरील व प्रवाशांसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यासाठी, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जातात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतही शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचं म्हटलं होतं.तसेच, मेट्रोचं जाळं विस्तारत असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल 53 टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेग 10.44 टक्क्यांनी वाढली आहे.

पुणे पोलिसांनी महत्वाची पत्रकार परिषद घेऊन या विषयी माहिती दिली. पुणे शहरात सर्वात पहिल्यांदा एटीएमएस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून वाहतुकीत सुधारणा करण्यात आली आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये केलेले बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था याची अंमलबजावणी यामुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे.

याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षीच्या 3 महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून कारवाईत सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आज पुण्यातील वाहतूक कोंडीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानुसार, शहरातील वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याने रस्ते मोकळा श्वास घेत आहेत.