महापालिकेची निवडणूक ‘मविआ’ एकत्र की स्वतंत्र?; महत्वाची माहिती आली समोर

0
1

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार, याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांची वैयक्तिक भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून समजती आहे. मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याबाबतीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? याबद्दलचा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. यातच मुंबईत महापालिकेची निवडणूक आघाडी एकत्र लढली तर ठाकरे गटाला फटका बसू शकतो, अशा भावना ठाकरे गटातील काही नेत्यांच्या असल्याने नेमकं महाविकास आघाडीत चाललंय काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवायची की नाही याबाबत संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते यावर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.