बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनने तिच्या फॅशन-फॉरवर्ड लुक ने कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत. तिच्या फॅशन निवडींसाठी आणि ट्रेंड-सेटिंगसाठी ओळखल्या जाणार्या, सनीने प्रतिष्ठित इव्हेंटमध्ये तिचे बहुप्रतीक्षित पदार्पण केले आणि फॅशन प्रेमींना आश्चर्यकित करून सोडल आहे.
विशेष मिडनाइट स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या तिच्या अत्यंत अपेक्षित चित्रपट “केनेडी” च्या प्रमोशनसाठी ती आली असताना सनीने फॅशन विश्वात तिच्या फॅशन ने सगळ्यांना भुरळ घातली असून मंत्रमुग्ध पोशाखां ची अनोखी झलक दाखवली आहे.
तिच्या स्टँडआउट लूकपैकी एक जल्फर मिलाओ लेयर्ड कोल्ड-शोल्डर ड्रेस पॅटर्नने अगदीच खास दिसतो. तर तिने आत्मविश्वासाने काळ्या स्ट्रेपी हील्स मध्ये ती उत्तम दिसतेय. सनीच्या फॅशनच्या चॉईस साठी ती सगळीकडे चर्चेचा विषय ठरते आहे. तिच्या प्रत्येक नवीन लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘कान्स’मध्ये सनी लिओनने प्रेक्षकांची जिंकली मने !
कान्समध्ये तिच्या आकर्षक उपस्थितीशिवाय, सनीच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल तिच्या चाहत्यां मध्ये उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षक तिच्या पुढच्या प्रोजेक्ट ची आतुरतेने वाट पाहत आहे.