प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सव अनेक आकर्षक फॅशन चर्चा नी गाजला आहे आणि भारतीय सेलिब्रिटी आंतरराष्ट्रीय मंचावर आपली एक अनोखी छाप सोडत आहेत. या वर्षातील जबरदस्त नवोदितांपैकी, सनी लिओनीने तिची अस्सल उपस्थिती आणि तिच्या अनोख्या अदानी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
रॅपिटोच्या अत्यंत अपेक्षीत कार्यक्रमासाठी रेड कार्पेटवर पाऊल ठेवत सनीने रेड कार्पेट वर तिच्या फॅशन ने सगळ्यांची मन जिंकून घेतली. वाइन रेड वेल्वेट बॉडी-कॉन ड्रेस मध्ये सनी अगदीच सुंदर दिसत होती. प्रसिद्ध फॅशन उस्ताद जेमी मालौफ यांनी डिझाइन केलेले, खोल रुबी रंगाने सनीचे उठून दिसते. तिच्या प्रत्येक गोष्टी कान्स मध्ये कॅप्चर केल्या जात आहेत.
प्रतिष्ठित डिझायनर हेलेना जॉयच्या सुंदर दागिन्यांसह तिच्या लूक ला अजून बहारदार पणा आला आहे. तिच्या रेड-कार्पेट क्षणाने लक्ष वेधून घेतले.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली, आदरणीय कान्स ज्युरीने मध्यरात्री प्रदर्शनासाठी निवडलेल्या “केनेडी” या एकमेव भारतीय चित्रपटाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करत आहे. ती कान्सला रवाना होण्यापूर्वी, सनीने एक टीझर आउट केला जो प्रेक्षकांना “केनेडी” च्या मोहक दुनियेची एक झलक देतो, जो त्याच्या रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सगळेच उत्साही आहेत.
कान्समध्ये सनी लिओनीची उपस्थिती फॅशन प्रेमी आणि सिनेप्रेमींना मोहित करत आहे. तिच्या निर्विवाद फॅशन सेन्सने आणि आकर्षक रेड-कार्पेट वर तिने स्वतःला खऱ्या फॅशन आयकॉन म्हणून प्रस्थापित केले आहे.