मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक? हे आहे कारण? बाशिंग बांघलेल्या आमदाराचं काय?

0
1
मुंबई : राज्यासह केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरच होणार अशा चर्चांना उत आला होता. कर्नाटक निवडणुकीनंतर हा विस्तार होऊल असे बोलले जात होते. तर राज्यात शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून रस्सी खेच होताना दिसत होती. तर शिंदे गटातील अनेक नेते हे आपल्याला मंत्री पद मिळणारच आणि शिंदे-फडणवीस हे आपला शब्द पाळणार असे स्पष्टीकरण देत होते. मात्र आता या नेत्यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांवर पाणी पडण्याची शक्यता वर्तनली जात आहे.

कारण आहे केंद्र सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार. जो पर्यंत केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंतराज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारहोणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या वतिने शिंदे गटाला दोन मंत्रीपद दिले जाणार आहे. याच्याआधी शिंदे-ठाकरे गटाची सुनावणीमुळे हा केंद्र सरकारसह राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता मात्र केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लांबणीमुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला