ICC World Cup 2023 साठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही? PCB अध्यक्षांची BCCI समोर अट

0
2

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयनं काही महिन्यांपूर्वीच टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयनं जाहीर केलं आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू झाले. आगामी एकदिवसीय विश्वचषक  साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत, परंतु भारता शेजारील देश पाकिस्तानची वृत्ती काहीशी विचित्र आहे. खरं तर आशिया चषक स्पर्धेचं ठिकाण ठरवण्यावरून गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानकडे सोपवण्यात आली आहे. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयनं काही महिन्यांपूर्वीच टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

पीसीबीच्या अध्यक्षांची BCCI ला धमकी
बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आक्षेप घेतला. यानंतर, पाकिस्ताननं आशिया क्रिकेट कौन्सिलसमोर (ACC) ला एक ‘हायब्रीड मॉडेल’ सादर केलं. पाकिस्तानच्या या हायब्रीड मॉडेलनुसार, भारत-पाकिस्तान सामना UAE किंवा इतरत्र व्हावेत आणि इतर संघ पाकिस्तानमध्येच आपले सामने खेळतील असं सांगण्यात आलं होतं.

परंतु, पीसीबीचा प्रस्ताव स्वीकारण्यास एसीसीनं नकार दिला. आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. यासाठी कारण ठरलं आहे, ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांचं वक्तव्य. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटलं आहे की, जर टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तानचा संघही आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. दरम्यान, 2025 मध्ये पाकिस्तान चॅम्पियनशिप ट्रॉफीचं आयोजनही करणार आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

बीसीसीआयनं तर्कशुद्ध निर्णय घ्यावा : नजम सेठी
नजम सेठी म्हणाले की, “बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, त्यांनी ठरवलेल्या स्टेडियमवरच हा सामना व्हावा. पण आमची इच्छा आहे की, बीसीसीआयनं एक चांगला, तर्कशुद्ध निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला पुढे जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये. पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्हालाही आमच्या संघाच्या (पाकिस्तान) सुरक्षेची चिंता आहे. आयसीसीनं या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा, पण या प्रकरणात आयसीसीनं दखल द्यावी, अशी बीसीसीआयची अजिबात इच्छा नाही, असंही ते म्हणाले.

नजम सेठी पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय बेसबॉलपासून ते कबड्डीपर्यंतचे अनेक संघ पाकिस्तानमध्ये स्पर्धांसाठी येतात. पण टीम इंडियालाच काय अडचण आहे?

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात
यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह क्वालिफायर 1 चा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत. यानंतर डिसेंबरमध्ये 19 वर्षाखालील पुरुष आशिया चषक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.