संजय यांच्या धाडसाने पाचही मुलींचे प्राण वाचले मुली पुण्याच्या नव्हत्याचं; नेमंक काय घडलेलं?

0

गोऱ्हे गावामध्ये कामानिमित्त बुलढाणा मधील कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घरामध्ये काही कार्यक्रम असल्याने पाहुणे मंडळी आले होते. सकाळी पोहण्यासाठी घरातील लहान मुलींना हट्ट केला. त्यानंतर घरातील एक महिला आणि लाहन सहा मुली पोहायला गेल्या. कोणालाही पोहता येत नसल्याने सुरूवातीला काठावर असलेल्या मुली पाण्यात गेल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी भरल्यावर त्या बुडू लागल्या. इतर बाजूला पोहत असलेल्या मुलीही घाबरल्या पाण्यामध्ये प्रवाहामुळे त्या आत खेचल्या गेल्या आणि त्यांचाही जीव धोक्यात आला.

मुली बुडू लागल्यावर महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्याच दिवशी गावामध्ये सावडण्याच्या विधीला बरेच लोक जमले होते. ग्रामस्थ संजय माताळे हे सुद्धा विधीसाठी जात असताना त्यांना आवाज आल्यावर त्यांनी लगोलग वेळ न दवडता पाण्याकडे धाव घेतली. संजय यांनी पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलींना बाहेर काठावर आणलं. एक-एक करत त्यांनी पाच जणींना वाचवलं, काठावर असलेल्या ग्रामस्थांनी नाकातोंडातून आत गेलेलं पाणी बाहेर काढलं. त्यानंतर खानापूरमध्ये उपचारासाठी या सर्वांना दवाखान्यात हलवलं. या पाचही मुली वाचल्या पण सुरूवातीला आतमध्ये गेलेल्या दोघींना संजय माताळे वाचवू शकले नाहीत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

दरम्यान, संजय माताळे यांनी दाखवलेल्या धाडसाची पंचकृषीत चर्चा आहे. त्यांना मित्रं-मंडळी, नातेवाईक फोन करून त्यांचं कौतुक करत आहेत. संजय यांच्या धाडसाने पाचही मुलींचे प्राण वाचले आहेत. आता अनेकवेळा आपण पाहतो की लोक अपघात किंवा काही घटना घडल्यावर मदत करण्याआधी त्याचा व्हिडीओ किंवा फोटो घेतात आणि त्यातून वेळ मिळाला तर मदत करतात. अशांसाठी संजय माताळे चांगलं उदाहरण ठरले आहेत.