पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 1952 मध्ये समावेश झालेल्या कर्वेनगर प्रभागात ‘राम’राज्य व्हावी यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या स्वप्नील दुधाने यांच्या अथक प्रयत्नांमुळे 70 वर्षापासून रखडलेल्या कर्वेनगरच्या विकासाचे स्वप्न (2000 साली मायक्रो विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर) पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. कर्वेनगर भागातील पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील वर्षानुवर्षी आरक्षित असलेल्या जागांचे ताबे घेऊन त्या भागात संबंधित आरक्षण अस्तित्वात आणण्यासाठी गेली 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने स्वप्नवत वाटणारा कर्वेनगरचा विकास ‘स्वप्निल’च्या अथक प्रयत्नाने प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली असून पुणे महापालिकेच्या पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलचा भूमिपूजन सोहळा येत्या 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.






कर्वेनगरच्या विकासाचे स्वप्न ‘स्वप्निल’मुळे साकारतंय….
पुणे महापालिकेमध्ये सभासद म्हणून 2007 साली संधी मिळाल्यानंतर दुधाने परिवाराच्या वतीने कर्वेनगर भागात गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या विकास कामांच्या पूर्णत्वाचा ध्यास घेत योग्य पुरावा करून आरक्षित जागांवरती विकास करण्यास सुरुवात करण्यात आली. पुणे महापालिकेच्या वतीने मोठ्या गाजावाजात शिवणे खराडी नदीपात्रातील रस्त्याची घोषणा करण्यात आली होती; या रस्त्यालगतच कर्वेनगर भागातील आरक्षित जागा असल्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याशिवाय याचा वापर शक्य नाही याची जाणीव लक्षात घेऊन 2012 मध्ये पुन्हा सभासद म्हणून संधी मिळाल्यानंतर लक्ष्मी दुधाने यांनी सर्वप्रथम या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर आरक्षित जागांच्या विकास होण्याच्या अडथळा दूर होण्यास मदत झाली आहे. कर्वेनगर भागात महापालिकेच्या शाळा, क्रीडांगणे, इन- डोर, आऊट-डोर, उद्याने यासारख्या मूलभूत आरक्षित जागांचा विकास झाल्यानंतर आता नव्याने सुरू होणारे धनुर्विद्या संकुल म्हणजे केवळ एक इमारत किंवा मैदान नव्हे, तर अनेक नवोदित खेळाडूंचे स्वप्न साकार होण्याची आशा आहे. माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने व स्वप्निल दुधाने यांचा अथक प्रयत्न आणि प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे.
भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या विचारसरणी प्रमाणे आरक्षित जागांवर प्रकल्प झाल्यानंतर आपल्या घरातील पूर्वजांची नावे देण्यापेक्षा राष्ट्रपुरुषांच्या नावाने प्रकल्प समर्पित करण्याचा उच्च विचार अंगी बाळगत आजपर्यंत विविध प्रकल्प सुरू करण्यात आले आहे असून या धनुर्विद्या संकुल च्या माध्यमातून हा पायंडा अविरत सुरू राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
कर्वेनगरच्या शिरपेचात धनुर्विद्या संकुलच्या माध्यमातून आणखी एक तुरा लावला जाणार आहे. भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता, १०० फुटी डीपी रोड, सर्वे नंबर ९, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शेजारी, कर्वेनगर, पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचन्द्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.











