अवयवदान हे ईश्वरी कार्य! मृत आत्म्याचा अवयव रुपी पुनर्जन्मच: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
3

सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये अवयव दान ही एक ईश्वरी शक्ती मनुष्याला प्राप्त झाली असेल अवयव दानाच्या माध्यमातून मृत आत्म्याचा पुनर्जन्म होत असून याची जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या १००व्या मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने मॉडर्न विकास मंडळ, पूणे आयोजित देवदूत पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त अवयवदान चळवळीतील योगदान देणाऱ्या २१ घटकांना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एखाद्या त्रस्त व्यक्ती पुनर्जन्म मिळण्याचे आणि मृत आत्म्याचा पुन्हा अवयवरुपी जन्म देण्याचे काम या दोन्ही गोष्टी फक्त अवयव दानाने शक्य होत असतात. सध्या या अनोख्या मोहिमेबाबत जनजागृती करण्याची गरज असून काही कायदेशीर माहिती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर सध्या राज्यात आणि देशांमध्ये मोहीम सुरू झाली असेल आगामी काळामध्ये याची भव्यता सर्वसामान्य लोकांनाही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व शासकिय रुग्णवाहिका अन् आरोग्य व्यवस्थेतील वाहनांवर जागृती करण्यासाठी जाहिराती करण्याचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन यावेळी बोलताना त्यांनी दिले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

यावेळी बोलताना पुरस्कारार्थी मान्यवरांनी या अनोख्या आणि महत्वपूर्ण अभियानाबाबत शासकीय आणि सार्वजनिक स्तरावर लागणाऱ्या जनजागृतीमध्ये कोणते बदल करण्याची गरज आहे याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविकांमध्ये मॉडर्न विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप भुटाला यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि अवयवदानाची गरज याविषयी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ मनीषा भुटाला यांनी केले तर आभार संजय बुटाला यांनी मानले.

मी ही लाभार्थी: चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघ पहिली निवडणूक लढत असताना डोळे तपासणी करताना माझ्या डाव्या डोळ्यांमध्ये कॅन्सर असल्याची जाणीव संबंधित डॉक्टरांना झाली. सुरवातीला मला याबाबत कल्पना न देता जवळच्या लोकांना बोलावून घ्या असे डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मलाही काहीतरी भयंकर असल्याची जाणीव झाली होती. त्यानंतर बेंगलोरला माझ्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर माझे आयुष्य सध्या सुरळीत सुरू आहे. सकाळी मला त्या अवयवदात्याचे कायम स्मरण राहते.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

कदाचित जर अवयव दानाची संधी नसतीच तर माझे आयुष्य ही आता सध्या ज्या पद्धतीत सुरू आहेत असे न राहता त्रस्त झाले असते व्यक्तीश:  मेंदू मृत झाल्यानंतर अन्य अवयवांच्या रूपाने इतरांना मदत करणे हे ईश्वरी कार्य आहे याबाबत जेवढी जनजागृती करण्याची गरज आहे तेवढी करण्यास मी शब्दबद्ध आहे असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुरस्कारार्थींची नावे :

अवयव दाते

१) सौ. स्वराली संदीप गुजर

२) श्वेता संत (ब्रेनडेट पेशंटचे नाव सौ. टोकेकर)

३) पोपट केदारी (ब्रेनडेट पेशंटचे नाव – स्वप्निल केदारी)

अवयव प्रत्यारोपण सर्जन व अतिदक्षता विभाग प्रमुख

१) डॉ. प्रसाद राजहंस (अतिदक्षता विभाग प्रमुख, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल )

२) डॉ. रविंद्र कोलते (कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जन) ३) डॉ. वृषाली पाटील ( अवयत प्रत्यारोपण सर्जन)

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

अवयदान समन्वयक

१) श्रीमती आरती गोखले

(प्रमुख, पुणे विभाग प्रत्यारोपण समन्वय समिती)

२) श्रीमती वृंदा पुसाळकर

(समन्वयक, अवयव प्रत्यारोपण विभाग, जहांगिर हॉस्पीटल)

३) श्रीमती मयुरी बर्गे

(समन्वयक, अवयव प्रत्यारोपण विभाग, डीवाय पाटील हॉस्पीटल )

४) श्रीमती शर्मिला पाध्ये (समन्ययक अवयव प्रत्यारोपण विभाग, सह्याद्री हॉस्पीटल)

ग्रीन कॅरिडोअर प्रतिनिधी: इनामदार साहेब (पीएसआय), प्रकाश महादेव मोहिते, बाबाजी शंकर आहेर, जिवाजी पांडुरंग पोटे, सत्यवान बबन साबळे

स्वयंसेवी संस्था

१) सौ. मिनाताई कुर्लेकर – वंचित विकास व शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट

२) रिचर्च फाऊंडेशन श्री. राजेश शेट्टी

३) रोटरी इंटरनॅशनल क्लब सौ. अमृता देवगांवकर, श्री. मंदार देवगांवकर, श्री. संतोष परदेशी

४) जनकल्याण समिती (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ) – डॉ. अंजली चांदवले

५) लायन्स इंटरनॅशनल क्लब – ला. चंद्रहास शेट्टी

अवयव वाहतुक रुग्णवाहिका चालक

१) श्री. शंकर नेटके / अविनाश शिंदे

(रुबी हॉल हॉस्पिटल ॲडम्ब्युलन्स टीम)