हडपसर पोलीस “लोकशाही चषक” चे मानकरी

0
14

हडपसर (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर तर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “लोकशाही चषक 2023” पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभाचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये पोलिस क्रिकेट संघ हडपसर, डॉक्टर क्रिकेट संघ हडपसर, पत्रकार क्रिकेट संघ हडपसर आणि विधी महाविद्यालय विद्यार्थी संघ यांनी सहभाग नोंदविला.

लोकशाही क्रिकेट चषकाचे उद्घाटन हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, विधी महाविद्यालय प्राचार्या डॉ. रंजना पाटील, आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, जेष्ठ पत्रकार विलास जाधव, यांच्या हस्ते झाले.
संपूर्ण सामने एका दिवसात साखळी पद्धतीने पी. जी. क्रिकेट मैदान शेवाळवाडी याठिकाणी पार पडले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

अंतिम सामना हा ‘हडपसर पोलिस संघ’ विरुद्ध ‘हडपसर डॉक्टर संघ’ या दोन्ही संघामध्ये झाला. अटीतटीच्या झालेल्या या लढती मध्ये ‘हडपसर पोलिस संघ’ लोकशाही चषक 2023 चा मानकरी ठरला.

लोकशाहीच्या प्रमुख स्तंभानी एकत्रित येऊन आपसात एक चांगले वातावरण निर्माण व्हावे त्याच बरोबर दैनंदिन कामकाजातून थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशाने विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपुर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व विधी महाविद्यालय प्राचार्या डॉ.रंजना पाटील यांच्या हस्ते पार पडला.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

लोकशाही क्रिकेट चषकाच्या यशस्वी आयोजनासाठी विधी महाविद्यालय संघाचे कर्णधार सुहास कानगुडे, अमित किन्ड्रे, डॉ.रविन्द्र इंगळे, आशिष देवकर, केतन पवार, अमर पाटील, मीरा बोराडे, छाया रहाणे, प्रमोद डोकनिया, उल्हास खामकर, वैभव भोर, लक्ष्मण बचाटे, आशुतोष कोलते, सुफीयान शेख, सार्थक जगताप, अक्षय पाठक, राज काटे, शुभम शितोळे, रूषभ जगताप, उदय मिरकले, मनिषा ढवळे, अभि शिंदे, कमलेश कांबळे, हेमंत ढमढेरे, खंडू गायकवाड आदींनी त्याचबरोबर हडपसर पोलिस चौकीचे अधिकारी दिनेश शिंदे, डॉ. शंतनू जगदाळे, पत्रकार अनिल मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.