योगेश टिळेकरच्या कामांचे श्रेय राष्ट्रवादी चे आमदार घेत आहेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
14

पुणे (प्रतिनिधी) : मांजरी बु मध्ये माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या विकासकामांचे झडप घालून श्रेय घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार करत असल्याची टीका पुण्याचे पालकमंत्री,राज्याचे उच्च शिक्षण तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महादेवनगर येथे बोलताना केली.

मांजरी बु येथील ४२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा नामदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी आमदार योगेश टिळेकर,विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी,भाजपा सरचिटणीस गणेश घुले,कार्यकारी अभियंता महादेव देवकर,माजी सरपंच शिवराज घुले,पुरुषोत्तम धारवाडकर,माजी सभापती भूषण तुपे,माजी उपसरपंच अमित आबा घुले,सुमित अप्पा घुले,संजय धारवाडकर,उज्वला टिळेकर,प्रमोद कोद्रे,समीर घुले,सुनीता घुले,नयना बहिरट,सीमा घुले,निर्मला म्हस्के,दिपक palve,सत्यवान घुले,बाळासाहेब घुले,मधुकर पवार,नितीन खेडेकर,अविनाश कोद्रे,रोहित गायकवाड, सागर उजगरे,अभिजित डोंगरे,ऍड प्रमोद सातव,महिला नेत्या विजया वाडकर,स्मिता गायकवाड,सीमा शेंडे,छाया गदादे,महेश ससाणे,पोपट वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

मांजरी बु वासियांसाठी एक तरी विकासाचे काम केले असेल तर ते राष्ट्रवादीच्या आमदारानी दाखवावे,नदीवर चारपदरी पूलासाठी अतिरिक्त निधी आणण्याची इच्छाशक्ती नसल्याने दोन पदरी केला,यांच्या स्वार्थी राजकाराणामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले अशी टीका यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी केली.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यावेळी आपल्या भाषणात “स्वतः विकासकामे करायची नाहीत,भाजपच्या कामांत खोडा घालायचा हि राष्ट्रवादीची जुनी सवय असल्याचे सांगत जनतेने आता विकासाकरिता विधानसभेला योगेश टिळेकर यांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन केले.”

माजी सरपंच शिवराज घुले,अण्णा धारवाडकर,अमित आबा घुले यांनी ४२ कोटी रुपयांच्या पाणी योजना,रेल्वे उड्डाणपूल याकरिता माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा आपल्या भाषणातून सादर करत राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढविला. लोकार्पण सोहळा कार्यक्रमास मांजरी बु वासियांनी तुफान गर्दी केली होती,राष्ट्रवादीने करून दाखवलं या फ्लेस्क बाजीचाही जोरदार समाचार यावेळी विविध वक्त्यांनी घेतला.
सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काळे याना राष्ट्रीय पुरस्कार मिळालाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाँचे सुत्रसंचलन शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले तर आभार उजवला टिळेकर यांनी मानले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य