शिल्पा शेट्टीच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, नवरा पुन्हा अडचणीत… घरात आणि ऑफीसमध्ये ईडीची पुन्हा धाड

0
1

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. शिल्पा शेट्टीला मोठा धक्का बसला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफीसमध्येही ईडीने धाड टाकली आहे. शिल्पा -राज जुहू येथील घरात आणि ऑफीसमध्ये ईडीने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचं हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी नेटवर्क प्रकरणात ईडीने ही कारवाई करत धाड टाकली आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता शिल्पा आणि राज यांच घर तसेच ऑफीसती झडती घेतली जात आहे. ‘अश्लील’ चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा याला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता. दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर पडला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

असा उघड झाला राज कुंद्राचा बिझनेस

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने पॉर्न फिल्म्सद्वारे फक्त बक्कळ कमाई केली नाही तर त्यांनी देशाच्या कायद्यांना बगल देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. पण हे प्रकरण उघडकीस आलं तरी कसं ? मुंबई पोलिसांनी यासंदर्भात 4 फेब्रुवारी 2021मध्ये एक केस दाखल केली होती. मालवणी पोलिस स्टेशनमध्ये या रॅकेटसंदर्भात एका मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

चित्रपट आणि ओटीटीवर काम मिळवून देण्याच्या नावाखाली काही लोक तरूणींना अश्लील चित्रपटात काम करण्याची जबरदस्ती करत आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील अनेक व्यावसायिक अश्लील चित्रपटांचे शूटिंग करून मोठी कमाई करत आहेत असा दावाही या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मालाड वेस्टमधील एका बंगल्यावर छापा मारला. तो बंगला भाड्याने घेऊन तेथे पॉर्न फिल्मचे शूटिंग करण्यात येत होतं. पोलिसांनी छापा टाकून बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसह 11 जणांना अटक केली होती.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

त्यावेळी पोलिसांना राज कु्ंद्रा आणि त्याच्या कंपनीबद्दल काही सुगावा लागला होता, मात्र त्याच्याविरोधात कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना ठोस पुरावे गोळा करायचे होते. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्यांच्याकडे राज कुंद्राशी निगडीत बरीच माहिती होती. त्यामध्ये पीडित मुलींचा जबाब , व्हॉट्सॲप चॅट, ॲपवर उपलब्ध फिल्मस आणि राज कुंद्राच्या अश्लील फिल्म्स व्यवसायाचा संपूर्ण हिशोब होता. त्यानंतर कारवाई करत राज कुंद्रा याला अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी आता ईडीने पुन्हा धाडसत्र सुरू केले आहे.