बिचुकले ‘भाईजान’ला पाहून नेटकरी बिचकले; म्हणाले”आम्ही याचा निषेध करतो…”

0
3

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हे पोस्टर आऊट झाल्यानंतर एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.’किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये भाईजानचे विस्कटलेले केस दिसत आहेत. तसेच त्याने डोळ्याला गॉगलदेखील लावला आहे. ट्रेलर आऊट झाल्याची घोषणा करत सलमानने हे पोस्टर शेअर केलं होतं. पण हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता सलमानच्या फोटोच्या जागी अभिजित बिचुकलेचा फोटो असलेलं एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

भाईजानने केली बिचुकलेची कॉपी!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीममध्ये अभिजित बिचुकलेने सलमान खानची कॉपी केल्याचं पाहायला मिळत आहे. यात मीममध्ये अभिजित बिचुकलेटे विस्कटलेले केस दिसत आहेत. फक्त भाईजानने गॉगल लावला आहे. तर बिचुकलेने चश्मा लावला आहे. या बिचुकलेल्या मीमवरदेखील ‘किसी का भाई किसी की जान’ असं लिहिलेलं दिसत आहे. त्यामुळे आता भाईजानने बिचुकलेची कॉपी केली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

बिचुकलेल्या ‘भाईजान’ मीमवर कमेंट्सचा वर्षाव

अभिजित बिचुकलेचं मीम नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या मीमच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत म्हणत आहेत की,”बिचुकले भाईजानला पाहून बिचकलो, किसी का अभिजित किसी का बिचुकले, भाईजानने केली बिचुकलेची कॉपी, आम्ही याचा निषेध करतो, साताऱ्याची शान, भावी पंतप्रधान गचकले साहेब”. बिचुकलेल्या ‘भाईजान’ मीमवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बिचुकलेने शाहरुखचा सिनेमातील लुक त्याच्यासारखा असल्याचा दावा केला होता. बिचुकले म्हणाला होता की,”मी लहान असताना संजू बाबाचे लांब केस होते. पण आता 2022 साली आलेली हेअरस्टाईल माझी आहे. भाईजानच्या ‘बिग बॉस’मध्ये शाहरुखने मला पाहिलं असावं. त्यामुळे त्याने माझी हेअर स्टाईल कॉपी केली”.

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ कधी होणार रिलीज? 

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईजान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या सिनेमात सलमान खानसह पूजा हेगडे, शहनाज गिल, भूमिका चावला, आणि पलक तिवारीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली