चांदणी चौकात विचित्र अपघात सळया लोखंडी बार थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले; कंटेनरचा ड्रायव्हरसह २ जण अडकले

0
13

बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळयांची वाहतूक किती धोकादायक असते याचं ताजं उदाहरण पुण्यातील चांदणी चौकात झालेल्या अपघातातून दिसून आलं आहे. या सळया घेऊन जाणाऱ्या कंटनेरला अपघात झाल्यानं त्याखाली दोन जण अडकल्याची माहिती मिळते आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं चौकात मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे.

नेमकं काय घडलंय?

या अपघाताचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मालवाहतूक करणारी एक मोठी लॉरी दिसते आहे. या लॉरीवर मोठ्या आकाराचे बांधकामासाठी लागणारे लोखंडी बार आहेत. ही लॉरी मोठ्या प्रमाणावर असलेले हे बार घेऊन चांदणी चौकातून मुंबईच्या दिशेने निघाला होती. यावेळी अचानक ब्रेक दाबल्यानं यातील सळया किंवा लोखंडी बार हे थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसले. यामध्ये ड्रायव्हर आणि त्याचा एक सहकारी या केबिनमध्ये अडकून पडल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

दरम्यान, रस्त्यावरुन जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले असून काही तरुणांनी ड्रायव्हरला मदत करण्याचा प्रयत्न केला. हे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसलेले बार बाहेर काढून खाली जमीनीवर टाकण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण ते खूपच अवघड काम असल्याचं एकूण परिस्थितीवरुन दिसून येत आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं असून युद्धपातळीवर अडकलेल्या लोकांना सोडवण्याचं काम सुरु आहे.