झाशीमध्ये अतिक अहमदच्या मुलाचं एन्काऊंटर, UP पोलिसांची कारवाई

0
3

उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील शूटर असद याचं पोलिसांनी एन्काउंटर केलं आहे. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पाच लाख रुपयांचे बक्षीस अशलेला असद आणि मोहम्मद गुलाम यांना ठार करण्यात आले. दोघांकडूनही पोलिसांनी शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

एकीकडे उमेश पाल हत्याकांडाप्रकरणी अतिक अहमद आणि अश्रफ यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांना या प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. यूपी एसटीएफने झाशी येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याला ठार मारले आहे. त्याच्यासोबत उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करणारा मोहम्मद गुलाम हा सुद्धा मारला गेला आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

२४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे राजू पाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा घरी जात असताना कारजवळ दबा धरून बसलेल्या शूटर्सनी गोळीबार केला. यादरम्यान बॉम्बही फेकण्यात आले. या हल्ल्यात उमेश पाल आणि त्याच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन गनर्सचा मृत्यू झाला होता.

उमेश पालच्या पत्नीने या प्रकरणी अतिक अहमद त्याचा भाऊ अश्रफ याच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस शाइस्ता सह पाच शूटर्सचा शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांना आज याबाबत यश मिळालं आहे. पोलिसांना मोठी कारवाई करत ४७ दिवसांपासून फरार असलेल्या असद आणि गुलाम यांना ठार केलं आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे