भारतीय सैन्याच्या रणगाड्यांना नदीत मोठा अपघात, 5 जवान शहीद

0

लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात एक दु:खद घटना घडली आहे. शुक्रवारी युद्ध सुराव सुरु होता. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. सध्या या भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे.

शुक्रवारी दौलत बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा अभ्यास सुरु होता. सैन्याचे अनेक टँक्स इथे आहेत. रणगाडे नदीपार कसे नेले जातात, याचा अभ्यास सुरु होता. एक टँक नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक नदीचा प्रवाह गतीमान झाला. त्यात रणगाडा वाहून गेला. या रणगाड्यात 4 ते 5 जवान होते. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कुठला रणगाडा वाहून गेला? नदीच्या प्रवाहात T-72 रणगाडा वाहून गेला. हा रशियन बनावटीचा रणगाडा आहे. ज्यूनियर कमिशनड ऑफिसरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य चौघांचा शोध सुरु आहे. मंदिर मोर्हजवळ रात्री 1 च्या सुमारास अचानक पाणी पातळी वाढली.