ऋषभ पंत IPL 2025 चा सर्वात महागडा खेळाडू ठरताच अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट

0
1

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऋषभ – उर्वशी यांचं नाव देखील अनेकदा जोडण्यात आलं. सांगायचं झालं तर, जेव्हा 2022 मध्ये उर्वशीने एक सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यामध्ये ‘आरपी’मुळे तासनतास वाट पहावी लागली… असं लिहिलं होतं. ऋषभ पंत याची ओळख ‘आरपी’ म्हणून देखील आहे… अभिनेत्रीच्या पोस्टनंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता.

एवढंच नाही तर, ऋषभ जिथे जायचा तिथे अभिनेत्री त्याच्या मागे जात होती… असे आरोप देखील उर्वशी हिच्यावर करण्यात आलं. ऋषभ याच्यासाठी अभिनेत्रीने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. आता …’, IPL 2025 चा सर्वात महागडा खेळाडू ठरताच उर्वशी हिने क्रिप्टिक पोस्ट केली. अभिनेत्रीच्या पोस्टचा संबंध नेटकऱ्यांनी ऋषभ पंत याच्यासोबत जोडला आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

उर्वशी हिने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उर्वशी हिने हिने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ”जो लफ्ज़ कहूं वो होजाए.” असं लिहिलं आहे. सध्या उर्वशीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

अनेकांनी अभिनेत्रीच्या पोस्टला ऋषभ पंत याच्यासोबत जोडलं आहे. एका नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ’27 कोटी मिळाल्यानंतर पोस्ट ऋषभ पंत साठी तर नाही ना?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ऋषभ पंत 27 कोटी…’, सध्या सर्वत्र उर्वशीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

उर्वशी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण इतर अभिनेत्रींप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकली नाही. उर्वशी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.