…..म्हणून कसब्यात पराभव झाला? रासने यांची प्रतिक्रिया! तेव्हाही 90000 मते विरोधातच!

0

पुणे : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहे. 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. गिरीश बापट यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागला आहे. एकीकडे रवींद्र धंगेकर याच्याकडून विजयाचा जल्लोष केला असतांना पराभूत झालेले हेमंत रासने यांनी मी कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू असे म्हंटले आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

हेमंत रासने म्हणाले, भाजपने मला उमेदवारी दिली होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण मतदारांनी मला स्वीकारले नाही. मला का स्वीकारले नाही याबाबत मी आत्मचिंतन करेल. या निवडणुकीत मी कमी पडलो आहे. माझ्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक आहे. 2009 पासून हा संमिश्र असलेला हा मतदार झाला आहे. ही जागा सलग भाजपने जिंकली असली तरी यावेळी तिरंगी लढत झाली आहे. दोघांमध्येच ही लढत झाल्याने माझा पराभव झाल्याचे हेमंत रासने यांनी म्हंटलं आहे. जे हक्काचे मतदान कमी झालं आणि विरोधी पक्षाचे जे प्रमाण वाढलं त्यामुळे माझा पराभव झाला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आमची सत्ता होती म्हणून मंत्री दिसत होते. त्यांचे सर्वच नेते उपस्थित होते. सगळेच पक्ष राजकीय ताकद लावत असतात. मात्र शेवटी प्रचार यंत्रणा राबविली असली तरी लोकांपर्यन्त मी पोहचलो नाही असेही हेमंत रासने यांनी म्हंटलं आहे. हेमंत रासने पुढे म्हणाले या निवडणुकीत कोणते फॅक्टर चालले ते बघावे लागणार आहे. मतदार संघाची रचना बघितली तर त्याचाही फटका बसल्याचे हेमंत रासने म्हणाले आहे. यामध्ये गिरीश बापट आजारी पडले ते प्रचाराला आले नाही त्याचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे राज्यात झालेले सत्तांतर बघता आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लागला त्याचा ही फटका बसल्याचा प्रश्न विचारताच हेमंत रासने यांनी बोलणं टाळलं असून जनतेने मला का स्वीकारलं नाही याचा मी विचार करेल असं म्हंटलं आहे. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार असल्याचे हेमंत रासने यांनी म्हंटलं असून पराभव स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार