आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले आहेत. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर आज पासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष कार्यालयांमध्ये दोन दिवस इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप केले जाणार आहे. मात्र अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊ गर्दी पक्ष कार्यालयात झाल्याचे पाहायला मिळाले.






पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप (BJP) स्वबळावर निवडणूक लढवेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच भाजपने महापालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांपैकी 125 जागा जिंकण्याचं टार्गेट देखील ठेवलं आहे. हे टार्गेट गाठण्यासाठी भाजप रणनीती आखत असून त्याच दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश देखील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. या अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 2100 अर्ज इच्छुकांनी नेले असल्याचं समोर आला आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये चार जागांसाठी तब्बल वीस इच्छुक पक्षांकडून मैदानात उतरण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळत आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवारी अर्जाचा वाटप करण्यात आला होता. हे उमेदवारी अर्ज वाटप करताना इच्छुकांकडून शुल्क देखील आकारण्यात आलं होतं. प्रत्येक उमेदवाराकडून तब्बल दहा हजारांचे शुल्क पक्षानं घेतलं होतं. 260 इच्छुकांचे अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्राप्त झाले आहेत. सोबतच शिवसेना (उबाठा) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील उमेदवारी अर्ज मागवले आहेत. त्यांनी देखील उमेदवारी अर्जासाठी तब्बल साडेदहा हजार रुपये आकारले आहेत. आतापर्यंत तब्बल 200 इच्छुकांनी अर्ज घेतलं असल्याचं सांगितले जात आहे.
इतर राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या उमेदवारी अर्जासाठी शुल्क आकारला जात असताना भाजपने मात्र इच्छुकांना निशुल्कू अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्जांचे विक्री झाल्या असल्याचं बोललं जात आहे. अनेक माजी नगरसेवक आणि तर भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयाला भेट दिली त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी देखील अर्ज घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
घरामधील पती-पत्नी यांनी दोघांनीही उमेदवारी अर्ज घेऊन भरल्याचे पाहायला मिळेल. एकच कुटुंबामध्ये दोन ते तीन अर्ज देखील घेण्यात आल्याचं पाहायला मिळाले. उमेदवारी मिळेल का नाही ते पुढे पाहू पण अर्ज तर घेऊन ठेव अशा भूमिकेतून अनेकांनी अर्ज घेतले असल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, आज आणि उद्या दोन दिवस भाजपाच्या कार्यालयामध्ये इच्छुकांसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज घेण्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे याची कार्यकर्त्यांना खात्री असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले जात आहेत. प्रत्येक प्रभागांमध्ये 50 ते 60 अर्ज येत असून विचार करून उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे.













