ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. 40 वर्ष सोबत असलेले माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला आणखी धक्का बसल्याची माहिती आहे. माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. वैयक्तिक कारणामुळे पदाचा आणि सदसत्त्वाचा राजीनामा दिल्याचे सचिन कदम यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यात उघड संघर्ष होता. त्यामुळेच सचिन कदम यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.






दरम्यान, सचिन कदम यांच्या अचानक राजीनामामुळे रत्नागिरीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे. चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये सक्रिय काम केल्यानंतर सचिन कदम यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. अनंत गीते आणि विनायक राऊत यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून सचिन कदम यांची ओळख आहे. सचिन कदम यांच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
दरम्यान, सध्या कुठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया सचिन कदम यांनी दिली आहे. सचिन कदम यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सचिन कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
ठाकरेंची साथ सोडून नेते आणि आमदार जाणार अशी चर्चा असताना उद्धव ठाकरे यांच जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वक्तव्य उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. मी बाळासाहेबांना वडील म्हणून आणि पक्ष प्रमुख म्हणून ओळखत होतो. ते ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार, ही लढाई अशी मी अर्धात सोडून मैदान सोडणारा नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का…
माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र.
वैयक्तिक कारणामुळे पदाचा आणि सदसत्त्वाचा राजीनामा दिल्याचा सचिन कदम यांचा निर्वाळा.
भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यात होता उघड संघर्ष….
सचिन कदम यांच्या अचानक राजीनामामुळे रत्नागिरीतील उद्धव गटात खळबळ.
चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये सक्रिय काम केल्यानंतर सचिन कदम यांचा राजीनामा.
अनंत गीते आणि विनायक राऊत यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून सचिन कदम यांची ओळख.
सचिन कदम यांच्या पुढच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष…..
सध्या कुठेही जाणार नाही – सचिन कदम यांचे फोनवरून माहिती.
सचिन कदम यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश करण्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात चर्चां.













