फक्त कर्मचाऱ्यांच्या अहवालावर विसंबून न राहता प्रत्यक्ष मतदारयादी पडताळणी करा; निवडणूक आयोगाचे आदेश!

0

महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीत दुबार नावे, मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणे, बाहेरील मतदारांचा चुकीचा समावेश अशा गंभीर चुका मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. या गोंधळामुळे नागरिकांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे प्रशासनाची फजिती होत असल्याने महापालिका आयुक्तांनीच स्वतः पुढाकार घेऊन या मतदार याद्या तपासून घ्‍याव्यात असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यासंदर्भात पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मतदार यादी तपासण्यास सुरुवात केल्यानंतर त्यात अनेक गडबडी असल्याचे समोर येत आहे. हजारोंच्या संख्येने मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. मुंढवा भागातील मतदार वारजेमध्ये, खेड शिवापूरचे मतदार सिंहगड रस्त्यावर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदार गोखलेनगर भागात आले असल्याचेही समोर आले आहे.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

प्रारूप मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. संपूर्ण राज्यात पुण्यात सर्वाधिक पाचशेहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यापूर्वी प्रशासनाने विभागणी आयोगाच्या ‘सेक्शन चार्ट’नुसार केल्याचे सांगत चूक सॉफ्टवेअरमध्ये असल्याचा दावा केला होता. मात्र, आयोगाच्या सुधारीत आदेशानंतर आता या सर्व गोंधळाची जबाबदारी थेट महापालिका आयुक्तांवरच टाकण्यात आली आहे.

विधानसभा मतदारयादीचे योग्य प्रभागनिहाय विभाजन करण्याची जबाबदारी आयुक्तांवर आधी होती. मात्र प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर लेखनिकांच्या चुकांमुळे अनेक ठिकाणी मतदार चुकीच्या प्रभागात गेले. १ जुलै २०२५ च्या मूळ मतदारयादीत नाव असूनही संबंधित प्रभागात समावेश न झाल्याच्या प्रकरणांची उजळणी झाली. त्यामुळे अशा सर्व चुका आयुक्तांनी कोणाच्याही हरकतीची वाट न पाहता स्वतःहून या दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घ्या असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

वरिष्ठांनीही लक्ष घालावे

मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात नावे गेल्याबाबतच्या तक्रारींची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची प्रत्यक्ष तपासणी करूनच दुरुस्ती करावी. फक्त बीएलओ किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अहवालावर विसंबून न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी करावी. आलेल्या तक्रारींचा निपटारा दुसऱ्याच दिवशी करावा, ते प्रलंबित ठेवू नये असा आयोगाने दिला आहे.

”पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचा आढावा घेण्यासाठी हे सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्ताबरोबर बैठक घेतली जाणार आहे. त्यात मतदार यादी दुरुस्तीसाठी सूचना दिल्या जाणार आहेत.”

– नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!