काळाची गरज ओळखून मातोश्री वृद्धाश्रम चौकात उड्डाणपूल; स्वप्निल दुधाने यांची दूरदृष्टीची आखणी अन नियोजन

0

कर्वेनगर भागातील वाढती रहदारी लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या विकासासाठी पूर्णत्वाकडे जात असताना मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोर उड्डाण पुलाची गरज लक्षात घेऊन नव्या पिढीचे नेतृत्व असलेल्या स्वप्नील दुधाने यांच्याकडून या चौकात उड्डाणपूलाची बांधणी करण्यासाठी पाहणी करण्यात आली असून उड्डाणपूल करण्यासाठी नियोजनही सुरू झाले आहे. कर्वेनगर भागातील नागरिक राजाराम पूल चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा त्रास अनुभवत असताना विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी या उड्डाणपुलाचा नक्कीच फायदा होणार असे मत पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोथरूड अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी व्यक्त केले. मातोश्री वृद्धाश्रम चौकात दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असणारे चार मुख्य रस्ते एकत्र येत असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दीचा अनुभव हमखास येतो. पुणे मनपा आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांनी आजवर अनेकदा या समस्येवर तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला असून हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

कर्वेनगर आणि परिसरातील नागरिकांशी लोकप्रतिनिधी या नात्याने संवाद साधत असताना विषयावर सविस्तर चर्चा केली. नागरिकांशी चर्चा आणि विकास आराखड्याचा अभ्यास केला. दुधाने लॉन्स, महालक्ष्मी लॉन्सकडून येणारा १०० फुटी डीपी रस्ता म्हात्रे पुलाकडे जाताना मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोरील राजाराम पूल चौकात वाहतूक कोंडी होऊ नये वाहतूक सुरळीतपणे म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूल करण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्वेनगर ते सनसिटी सिंहगड रोड या दोन उपनगरांना जोडणाऱ्या मुठा नदीवरील उड्डाणपुलाचे काम सद्यस्थितीला ७०% पूर्ण झाले असून सदर रस्त्यावरील वाहतूक याच १०० फुटी डीपी रोडने अर्थात राजाराम पुलाकडे जाणार आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाण्याआधी सदर १०० फुटी डीपी रोडचे काम पूर्ण होणे, आवश्यक आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

कर्वेनगर भागात वाहनांची संख्या भविष्यात आणखी वाढणार असून मातोश्री वृद्धाश्रम चौकामध्ये वाहतूक कोंडीचा ताण वाढतच जाणार आहे. भविष्यातील हा ताण लक्षात घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी महालक्ष्मी लॉन्स समोरुन जाणाऱ्या या १००फुटी डीपी रस्त्यावरून म्हात्रे पुलाकडे जाण्याकरिता उड्डाणपूलाची आवश्यकता अधोरेखित होत आहे. याबद्दल गुरुवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी पुणे मनपाचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम यांची प्रत्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी भेट घेतली असून निवेदन देत त्यांच्याकडे संबंधित अधिकारी यांच्यासह पाहणी करण्याची मागणी केली होती. यावेळी पत्रावर त्यांनी पथ विभागाचे मुख्य अधिकारी श्री अनिरुद्ध पावसकर सर यांना सूचना केली आणि त्या अनुषंगाने आज त्वरित सकाळी १० वाजता पथविभाग, प्रकल्प विभाग या पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम येथे पाहणी करून याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे

यावेळी माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पुरुषोत्तम भूतडा सर, प्रकल्प विभागाचे श्री. श्रीकांत गायकवाड सर, पथ विभागाचे उपअभियंता केदार वझे सर याचसह पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. पियुष भोंडे सर यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली आणि समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पुणे महापालिकेकडे निवेदन आणि नकाशा देत याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून अधिकारी वर्गानेही यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यावर विचारविनिमय केला जाईल, असा शब्द दिला असल्याचे स्वप्निल दुधाने यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.