धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; ८९ व्या वर्षी जगाचा निरोप, सिनेसृष्टीवर शोककळा

0

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे १० नोव्हेंबर २०२५ रोजी वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या त्यांना ३१ ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान आणि लोकप्रिय अभिनेता होते, त्यांनी आपल्या दमदार अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि प्रेक्षकांवरील अपार प्रेमामुळे ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ अशी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसराली या गावात झाला. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी ‘फूल और पत्थर’ (१९६६) या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टर नामांकन मिळाले आणि तेव्हा पासून ते बॉलिवूडमध्ये स्थिरावले.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

१९७० आणि १९८० च्या दशकात धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले जसे की ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘यादों की बारात’, ‘धरम वीर’, ‘रजिया सुल्तान’ आणि ‘दिल्लगी’. शोले मधील वीरूची भूमिका तर आजही लोकांच्या मनात कोरलेली आहे. त्यांच्या अभिनयात विनोद, रोमँस, ऍक्शन आणि इमोशन्स यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

धर्मेंद्र हे केवळ अभिनेता नाहीत तर त्यांनी काही चित्रपटांमध्ये निर्मात्याचे कामही केले. त्यांच्या विजेता फिल्म्स या बॅनरखाली अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती झाली. त्यांचे दोन मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली असून धर्मेंद्र यांचा कलाविश्वातील वारसा पुढे चालू ठेवला आहे. धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘सर्वात प्रेमळ अभिनेता’ ठरले आहेत. त्यांच्या कार्यातून त्यांनी दाखवून दिले की, कलाकार वयाने नव्हे तर मेहनतीने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने मोठा होतो.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!