पुणे बिबट्यांची भलतीच दहशत! काही दिवसात 12 मृत्यू शासन लक्ष देईना शेतकऱ्यांचं जगण्याचे हे …अनोख जुगाड!

0

पुणे जिल्ह्यातील शिरूर पट्ट्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, भीतीचे वातावरण आहे. शासन स्तरावर फक्त कागदांच्या हालचाली सुरू असल्याने आपला नित्यक्रम अन जगण्याची लढाई पूर्ण करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी किमान जीव वाचवा यासाठी अनोखा जुगाड केला असून शेतामध्ये काम करताना एखादा दागिना घालावा तसा हा जुगाड पुरुष महिला यांच्या गळ्यामध्ये दिसत आहे. संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत असल्यामुळे कामगार मिळत नसताना आपला पारंपारिक शेतीचा व्यवसाय पूर्ण कसा करायचा या विवंचनेत असलेल्या शेतकरी महिला भगिनी व पुरुषांनी बिबट्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी येथील महिला शेतात काम करताना गळ्यात खिळ्यांचे लोखंडी पट्टे घालत अनोखे जुगाड बनवले आहे.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

पुणे परिसरामध्ये अति प्रचंड बिबट्यांची संख्या वाढली असताना सुद्धा राज्य शासनाच्या वतीने ठोस व निर्णय घेतला जात नसल्याने चिमुकल्या बाळांसह महिला भक्ष होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची याबाबत प्रचंड नाराजी असतानाही खाजगी यंत्रणांमार्फत सोय करण्याची नियोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्याने जीव सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिक अशा प्रकारचे वेगवेगळे जुगाड करत आहेत. बिबट्या किंवा वाघ प्रामुख्याने मानेवर हल्ला करतात, त्यामुळे किमान जीव सुरक्षित राहावा या हेतूने महिलांनी हा उपाय अवलंबला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्नरमध्ये नुकतेच एका सीसीटीव्हीमध्ये तीन बिबटे एकाच वेळी आढळून आले, ज्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहशतीमुळे महाराष्ट्रात शेतकरी व शेतमजूर लोकांना स्वतःच्या संरक्षणासाठी असे कठीण उपाय करावे लागत आहेत.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार