गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, वडील ढसाढसा रडले “भपक्यावर जाऊ नका तुमच्या मुली श्रीमंतांना देऊ नका, त्यापेक्षा..”; 

0

गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचं लग्न फेब्रुवारी २०२५ मध्ये झालं होतं. अवघ्या दहा महिन्यांतच गौरीने आयुष्य संपवलं. त्यानंतर अनंत गर्जेंना अटक करण्यात आली आहे. गौरी पालवेच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी ढसाढसा रडत आपल्या मुली श्रीमंताना देऊ नका असं म्हटलं आहे. त्यांची अवस्था पाहून पोलीसही स्तब्ध झाले.

२२ नोव्हेंबरला गौरीने संपवलं आयुष्य

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २२ नोव्हेंबरच्या रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

गौरीच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

तुम्हाला मुली असतील तर इतकंच सांगतो, तुमच्या मुली गरीबांना द्या, श्रीमंतांना देऊ नका. भपक्यावर जाऊ नका. अनंत गर्जेला अटक केली आहे हे मला व्हिडीओ कॉलवर दाखवा अशी विनंतीही त्यांनी पोलिसांना केली. पोलिसांनी त्यांना व्हिडीओ कॉलवरुन अनंत गर्जेंना अटक झाल्याची माहिती दिली.

फॉरेन्सिकचे अधिकारी काय म्हणाले?

फॉरेन्सिक विभागाचे अधिकार म्हणाले की आम्हाला पोलिसांनी पत्र दिलं होतं. त्यांना ज्या गोष्टींची सँपल हवी आहेत. आम्ही आता अनंत गर्जेंच्या घरातले सगळे सँपल्स आम्ही लॅबला पाठवले आहेत. आम्ही सगळी तपासणी करुनच अहवाल आहे. आत्ता आम्हाला याबाबत काहीही सांगता येणार नाही. जो अहवाल आहे तो आत्ता आम्ही तपास अधिकाऱ्यांना देऊ. पोलीस ठाण्यात जाऊन जी माहिती आहे ती आम्ही घेऊ. त्यानंतर अहवालात त्या गोष्टी नमूद करण्यात येतील. असं डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितलं.

अधिक वाचा  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता! लोकसभेत १५ बैठका, ९२ तास काम, १० विधेयके ८ मंजूरचे कामकाज

गौरीच्या मामा श्रीनिवास यांनी काय म्हटलं आहे?

गौरीचे मामा श्रीनिवास म्हणाले गौरीने आत्महत्या केलेली नाही. अनंत गर्जेने तिच्या वडिलांना फोन केला आणि कट केला. त्यानंतर त्याने गौरीच्या आईला फोन केला आणि सांगितलं की गौरीने फाशी घेतली आहे. गौरीने फाशी घेतली तर अनंतने तिला रुग्णालयात न्यायला हवं होतं. आम्ही पोलिसांकडे गेलो तर आमच्या बरोबर यायला हवं होतं. पण तो कुठेही आला नाही. अनंत गौरीला टॉर्चर करत होता. तिचा छळ करत होता. कारण गौरीला अनंतबाबत काही गोष्टी समजल्या होत्या. अनंतचं अफेअर चाललं होतं आणि ते गौरीला कळलं होतं. गौरीच्या लग्नात तिच्या वडिलांनी ६० लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर दोन महिने बरे गेले. त्यानंतर तिला अनंतने छळायला सुरुवात केली होती असा गंभीर आरोप गौरीचे मामा शिवदास यांनी केला आहे.

अधिक वाचा  भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनात साम्य आहे – राजेश घाडगे