पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान, ताराराणी फाउंडेशन व राधिका क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “संघ गंगा के तीन भगीरथ” या प्रेरणादायी नाट्यप्रयोगाचे कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादरीकरण करण्यात आले.






या नाट्यप्रयोगातून संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार, परमपूजनीय श्री गुरुजी गोलवलकर आणि परमपूजनीय बाळासाहेब देवरस या तीन सरसंघचालकांचा राष्ट्रसेवेने परिपूर्ण जीवनप्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला. त्यांचा त्याग, विचार आणि कार्यपद्धती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेली. नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रेक्षागृह हाऊसफुल्ल होऊन उपस्थितांनी उभे राहून कलाकारांना दाद दिली.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहून कलाकारांचा गौरव करण्यात आला. नाट्यप्रयोगाच्या यशस्वी आयोजनामागे शिवगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित तोरडमल व श्वेता तोरडमल यांचे विशेष योगदान राहिले. त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम कोथरूडकरांसाठी अविस्मरणीय ठरला. संघशताब्दी वर्षानिमित्त अशा सांस्कृतिक उपक्रमांद्वारे सामाजिक व राष्ट्रीय विचारांचा जागर होण्यास मदत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.











