कोथरूडकरांसाठी ऐन दिवाळीत गुडन्यूज! बालभारती ते पौड फाटा रस्ता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

0

बालभारती पौड रोडला जोडणाऱ्या वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला महापालिकेने पर्यावरण परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बालभारती ते पौड रस्त्यादरम्यानचा सुमारे दोन ते सव्वादोन किलोमीटरचा रस्ता भांडारकर संस्थेजवळील टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला आक्षेप घेत काही सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला आहे.

यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे, ही बाब महालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने याकामासाठी इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स घ्यावा आणि त्यानंतर काम करावे असे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. न्यायालयाची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील समजू शकेल असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ऍड. अभिजीत कुलकर्णी, ऍड. राहुल गर्ग, ऍड. धवल मल्होत्रा आणि ऍड. निशा चव्हाण यांनी काम पाहिले. डॉ. सुषमा दाते आणि आय एल एस विधी महाविद्यालय या प्रकरणी न्यायालयात गेले होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

प्रकल्पाबद्दल आक्षेप आणि न्यायालयीन वाद

पर्यावरणीय चिंता : रस्ता वेताळ टेकडीच्या हरित पट्ट्यातून जातो, ज्यामुळे झाडे तोडली जातील अशी भीती आहे.

2. पर्यावरणवादी संघटनांचा विरोध : नागरी चेतना मंच, सुषमा दाते आणि इतर पर्यावरणप्रेमींनी यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

3. सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) ने ‘हा भाग Deemed Forest मध्ये मोडतो’ असे निरीक्षण दिले आणि बांधकाम थांबविण्याची सूचना केली.

4. पुणे महापालिकेचा दावा : रस्ता वेताळ टेकडीला न बाधक पद्धतीने आणि फ्लायओव्हर तंत्राने बांधण्यात येईल, त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

५.वेताळ टेकडीतील झाडे, जैवविविधता आणि भूजल पातळीवर परिणाम होईल.

६.’डोंगर फोडून रस्ता’ केल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल.

विद्यमान रस्त्यांचे सुयोग्य नियोजन केल्यास हा नवीन रस्ता आवश्यक नाही

प्रकल्पाचे फायदे

एफ.सी. रोड, गणेशखिंड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.

कोथरूड-शिवाजीनगर प्रवासात वेळ वाचेल (सुमारे 20-25 मिनिटांची बचत).

शिवाजीनगर आणि चांदणी चौक-पुणे सेंट्रल दरम्यान वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

प्रकल्पाचा सारांश सविस्तर माहिती- 

रस्त्याचे नाव बालभारती ते पौड फाटा रस्ता

अंतर सुमारे 2.1 ते 2.3 किमी रुंदी अंदाजे 30 मीटर

संस्था पुणे महानगरपालिका (PMC)

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

प्रमुख उद्दिष्ट

कोथरूड-शिवाजीनगर वाहतुकीवरील ताण कमी करणे

अंदाजित खर्च ₹160 कोटींच्या आसपास (अद्ययावत अंदाज बदलू शकतो)