धम्मप्रेमी हा नेहमीच उन्नतीपथावर जातो तर धम्मद्वेषी हा कायमच अधोगतीच्या मार्गावरील वाटसरू असतो : प्रशांत मोहिते

0

मुंबई दि. २२ (रामदास धो. गमरे) “भगवान तथागत गौतम बुद्ध श्रावस्ती येथे असताना एके रात्री एक देवता संपूर्ण जेतवन प्रकाशित करीत तथागतांजवळ आली व भगवंताला वंदन करून विचारू लागली की “हे तथागता पराभवाला पावणारा माणूस कोणता व त्या माणसाच्या पराभवाची कारणे कोणती ? त्यावर बुद्धांनी सांगितलं की बुद्धांनी सांगितले आहे की जे शिल सदाचाराचे आचरण करित नाही, दुराचारि आहेत व्यभीचारि आहेत, हिंसा करणारे आहेत, चोरी करणार, खोटे बोलणारे, व्यसनी हे दृष्ट व्यक्ती असतात, जे खोटेपणा करतात असत्यावर चालतो ते स्वतःच आपल्या जीवनाचा पराभव करतात. जे आळशी आहे, परिश्रम करीत नाही आपले कर्तव्य पार पाडत नाही ते समाजात मागे पडतात. जे दुष्टांच्या संगतीत रमतात, वाईट प्रवृत्तीचा स्वीकार करतात त्यांचे मन हळूहळू अंधकारमय होते. जे मद्यपानात, दुराचारात, लोभ आणि कामवासनेत अडकतात ते स्वतःची प्रतिष्ठा गमावतात. क्रोध, मत्सर आणि द्वेष यांच्या आहारी जाणारा मनुष्य स्वतःच्या शांतीचा, स्वतःच्या आनंदाचा नाश करतो आणि जो धम्माची निंदा करतो सत्य व सद्गुणांचा अवमान करतो आणि समर्थ असून आपल्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळत नाही तो माणूस स्वतःच्या पराभवास कारणीभूत ठरतो व खऱ्या अर्थाने पतन पावतो म्हणून धम्मप्रेमी हा नेहमीच उन्नतीपथावर जातो तर धम्मद्वेषी हा कायम अधोगतीच्या मार्गावरील वाटसरू असतो व हेच त्याच्या पराभवाचे कारण आहे.” असे प्रतिपादन प्रवचनकार प्रशांत मोहिते यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास मालिकेचे बारावे पुष्प गुंफत “पराभव सुत्त” या विषयावर बोलत असताना केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले त्यावेळी प्रवचनकार प्रशांत मोहिते यांची सभागृहाला ओळख करून दिली तसेच २२ सप्टेंबर पासून होणाऱ्या श्रामनेर शिबिरात सहभागी होण्यासाठी २६ जणांनी नावनोंदणी केली असून अजून कोणाला सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी नावनोंदणी करावी असे आवाहन केले सोबतच स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आपल्या भाषणात सभागृहाला संबोधित करत असताना सभापती आनंदराज आंबेडकरांनी प्रवचनकार प्रशांत मोहिते यांनी “पराभव सुत्त” या विषयावर बोलत असताना अत्यंत मुद्देसूद मांडणी करीत माणसाच्या पराभवाची कारणे यावर योग्य विवेचन करीत धम्मप्रेमी व धम्मद्वेषी यातील फरक सर्वसामान्यांनाही समजेल इतक्या साध्या व सोप्या परंतु प्रभावी भाषेत समजावून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीस मंगलकामना दिल्या.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत उपसभापती विनोद मोरे, समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, विठ्ठल जाधव, लवेश जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, जी. डी. गमरे, महेंद्र कांबळे, मिलिंद जाधव, मंगेश जाधव, दर्शन कांबळे, संतोष सावरकर, संदेश गमरे, तुकाराम घाडगे, माजी चिटणीस, अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, सचिव सावी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी भगवान साळवी, किशोर साळवी, सुभाष साळवी, सुधीर साळवी, स्वाती भगवान साळवी, ज्योती किशोर साळवी, प्रिया साळवी, कार्तिकी साळवी व परिवार यांच्या वतीने उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदानस्वरूपात अल्पोपहार देण्यात आला. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, प्रवचनकार प्रशांत मोहिते व अल्पोपहार देणाऱ्या भगवान साळवी व त्यांच्या परिवाराचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा