महाराष्ट्रात तीन ते चार वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेच थेट 4 महिन्यांच्या कालावधीत निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले बालेकिल्ले पुन्हा मिळवण्यासाठी ॲक्टिव्ह मोड घेत पुणे जिल्ह्यात पुढील चार महिन्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला आपल्या पक्षाच्या मतदारसंघात दोन ठिकाणी याची चाचणी केल्यानंतर मनाला घरी जखम देणाऱ्या खडकवासला मतदारसंघांमध्ये थेट भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये ‘जनसंवाद’ व परिवार मिलन कार्यक्रमाचे आयोजन करून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.






खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायमच चांगला प्रतिसाद येत होता. 2017 चे निवडणुकीमध्ये मात्र याला खंड पडून मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून आल्याने पुणे महापालिकेतील सत्ता जाण्यास कारण ठरलेल्या खडकवासला मतदारसंघात अजित दादा पवार यांनी भाजपशी टशन जाहीर केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारच ऍक्टिव्ह झाल्याने सर्व इच्छुकांनी खडकवासला मतदार संघ गुलाबी रंगाच्या फलकाने गुलाबी गुलाबी करून टाकला आहे. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू झाले असून वाढता जना प्रतिसाद लक्षात घेता तिसऱ्या कार्यक्रमापासून फलकबाजीचा नवा बदल रस्त्यावर दिसत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रणनीतीस बालेकिल्ल्यात सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. सत्ता संघर्षाच्या लढाईनंतरही अजितदादा पवार यांनी आपल्या बालेकिल्लातील मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी योग्य रणनीती आखून यशस्वी वाटचाल केली आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळालेल्या यशाच्या भरोशावर आत्ता पुणे जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही यश मिळवण्यासाठी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना झटकून कामास लागण्याच्या सूचना दिल्या असून त्याचाच एक भाग म्हणून जनसंवाद मेळावा राष्ट्रवादी परिवार मिलन अशा दोन कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं होतं. मात्र, मागील काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड काहीशी सैल होताच नियोजनामध्ये सर्वोच्च असलेल्या भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर मागील निवडणुकीमध्ये भाजपने आपला झेंडा रोवला. अस असलं तरी पुणे जिल्हा परिषदेवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली. मात्र भाजपने या भागातील आघाडीतील नेते आपल्याकडे घेत पक्षाचे वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली अन अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळी भूमिका घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचा धडाका सुरू केला आहे. आता अजित पवार यांच्याकडूनही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या भागात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ‘जनसंवाद’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ या दोन कार्यक्रमाची आखणी करण्यात केली आहे. यात जनसंवाद कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांसह थेट लोकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडविणार आहेत.
राष्ट्रवादी परिवार मिलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या थेट घरी जाऊन जेवण, अल्पोपहार घेत आहेत आणि कार्यालयांना भेट देऊन संघटना मजबूत करण्याचं काम करत आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून या दोन्ही कार्यक्रमाला अजित पवारांनी सुरुवात केली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवडमध्येही अशाच पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील दोन नियोजनापेक्षा दुप्पट ताकदीने पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून खडकवासला ही अजित दादा पवार यांची ‘दुखती रग’ असून या मतदारसंघातील सर्वच प्रभागात भव्य नियोजन दिसत आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ व निरीक्षक अक्रूर शेठ कुदळे यांनी यशस्वी नियोजनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पुणे जिल्ह्यात अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढील टप्प्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून आयोजित करणार येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतः ग्राउंडवर उतरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची पार्श्वभूमी तयार करत आहेत. एकीकडे भाजपाकडून आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोर लावला असताना दुसरीकडे अजितदादा स्वतः मैदानात उतरल्याने आता हा सामना अधिक रंजक होणार, राज्याच्या सत्तेत एकत्र असतानाही रस्त्यावर मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी आम्ही सामने होणार असं बोललं जात आहे.










