हिंडेनबर्ग रिसर्च’चे स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप; ‘सेबी’ची अदाणी समूहाला क्लीन चीट दंड किंवा कारवाईची शक्यताही नाकारली

0

गौतम अदाणी आणि अदाणी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. भांडवली बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात ‘सेबी’ ने गुरुवारी अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदाणी समूहावर केलेले स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप फेटाळून लावले आहेत. सेबीने अदाणी समूहावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असे म्हटले आहे. तसेच सेबीने गौतम अदाणी, राजेश अदाणी, अदाणी पोर्ट आणि अदाणी पॉवर याच्याविरोधात दंड किंवा कारवाईची शक्यताही नाकारली आहे.

सेबीला कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही, संबंधित नसलेल्या पार्टीबरोबरच्या अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी त्यावेळी रिलेटेड पार्टी डिलिंग्ज ही व्याख्या लागू नव्हती (ही व्याख्या २०२१ च्या सुधारणेनंतर लागू करण्यात आली) असे सेबीने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये नमूद केले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सेबीने असेही नमूद केले आहे की, या कर्जांची व्याजासह परतफेड करण्यात आली, तसेच कोणताही निधी बाहेर वळवला गेला नाही. त्यामुळे कोणतीही फसवणूक किंवा ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस’ झाली नाही. त्यामुळे अदाणी समूहाविरोधातील सर्व प्रकरणे बंद करण्यात आली आहेत.

हिंडेनबर्गने जानेवारी २०२१ मध्ये आरोप केला होता की अदाणी समूहाने अॅडिकॉर्प इंटरप्रायजेस, माइलस्टोन ट्रेडलिंक्स, आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांचा वापर अदाणी ग्रुप फर्म्समध्ये पैसे वळवण्यासाठी केला. यानंतर असा दावा केला गेला की यामुळे अदाणी समूहाला गुंतवणूकदारांची दिशाभूल होऊ शकते अशा रिलेटेड पार्टी ट्राजिक्शन संबंधी नियम टाळण्यात मदत झाली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन