AI क्षेत्रात ‘अक्षय कुमार’सारखा श्रीमंत होण्याची संधी! 2550 कोटी रुपयांचं जबरदस्त पॅकेज देतायेत कंपन्या!

0
23

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सध्या मोठी खळबळ माजली आहे. AI तंत्रज्ञानात पारंगत असणाऱ्यांना आज कंपन्या अक्षरशः सोन्याहून महाग मानत आहेत. इतकंच नाही, तर या क्षेत्रातील तज्ञांना मिळणारं पगाराचं आकडं थेट बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या संपत्तीकडे झुकतंय. जगभरातील काही AI तज्ज्ञांना तब्बल 2550 कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेजेस देऊन कंपन्या त्यांना आपल्या टीममध्ये सामील करत आहेत.

अहवालांनुसार, अभिनेता अक्षय कुमारची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटी रुपये आहे. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, AI एक्सपर्ट बनणं म्हणजे अक्षय कुमारसारखा श्रीमंत होण्याचा मार्ग आहे!

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

Windsurf CEOचा Googleमध्ये प्रवेश, सोबत AI टीमही
AI क्षेत्रातली ही स्पर्धा किती टोकाची झाली आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजे Windsurf नावाच्या कंपनीतील घडामोडी. कंपनीतील कर्मचारी मोठ्या डीलसाठी वाट पाहत होते. पण अचानक बातमी आली की, कंपनीचे CEO राजीनामा देऊन Googleमध्ये प्रवेश करत आहेत, आणि त्यांच्यासोबत अनेक AI रिसर्चर आणि इंजिनियरही Googleमध्ये सामील होत आहेत.

या घडामोडीनंतर तीन दिवसांत Windsurfला दुसरी AI कंपनी विकत घेणार असल्याचंही जाहीर झालं. यावरून स्पष्ट होतं की, आज AI रिसर्चर्सची बाजारात जी मागणी आहे, ती एखाद्या स्टार सेलिब्रिटीप्रमाणे आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

Metaच्या ‘AI ड्रीम टीम’साठी प्रचंड स्पर्धा
या सगळ्या स्पर्धेच्या केंद्रस्थानी आहे Meta. मार्क झुकरबर्ग AIच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते वेगवेगळ्या कंपन्यांतील टॉप AI रिसर्चर्सना आपल्या “ड्रीम टीम” मध्ये घेण्यासाठी मनासारखं पगार आणि सवलती देत आहेत.

त्याचा थेट परिणाम म्हणजे, इतर कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ब्रेन ड्रेन’चा धोका सतावतोय. त्यामुळे प्रत्येक कंपनी आता आपल्या AI टॅलेंटला टिकवण्यासाठी आणि नवीन प्रतिभा खेचण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करत आहे, मग त्यात पगारात भरमसाठ वाढ असो किंवा स्टॉक ऑप्शन्स, बोनस आणि वेगळी प्रगती योजना असो.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे