“संघर्षातून सिद्धी – डॉ. मनोज जोगराणा यांचा Ph.D. पर्यंतचा प्रवास”

0
3

मुंढवा – अत्यंत साध्या आणि गरिबीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या डॉ. मनोज भीमा जोगराणा यांनी आपल्या अथक मेहनती, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. सध्या ते देशातील नामांकित SVKM’s NMIMS Global University – School of Pharmacy & Technology Management, धुळे येथे विभागप्रमुख (Head of Department) म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी B.Pharm, M.Pharm आणि MBA केल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुजरात टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथून Ph.D. प्राप्त केली. डॉ. जोगराणा यांचे मूळ गाव चिरोडी (ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) असून सध्या त्यांचे वडील श्री भीमा भाई संग्राम भाई जोगराणा अमरावती येथे वास्तव्यास आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाची वाट चालत त्यांनी स्वतःस उच्च शिक्षणासाठी समर्पित केलं. त्यांच्या वडिलांनी मेहनतीने कुटुंबाला उभं केलं आणि त्या आधारावर डॉ. मनोज जोगराणा यांनी आपली ओळख निर्माण केली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी, खराडी येथे सलग १८ वर्षे वरिष्ठ व्याख्याता म्हणून सेवा बजावली. शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहतानाच त्यांनी सामाजिक आणि मानसिक आरोग्य विषयक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ५० पेक्षा अधिक ठिकाणी ‘तणाव व्यवस्थापन’ (Stress Management) या विषयावर विशेष व्याख्यानं घेतली आहेत, ज्याचा लाभ हजारो तरुण व नागरिकांना झाला आहे.

डॉ. मनोज जोगराणा गेली २३ वर्षे ब्रह्माकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक विचारसरणीचे पालन करत आहेत. त्यांना ब्रह्माकुमारी पुणे GPO सबझोनच्या संचालिका राजयोगिनी उर्मिला दिदी आणि राजयोगिनी सुलोचना दिदी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

“माझ्या वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या अध्यात्मिक आधारामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या यशामागील सर्वांचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.