पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी शाहिद कुट्टेसह तिघांचा खात्मा; शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई

0

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी शाहिद अहमद कुट्टे चा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातही त्याचे नाव पुढे आले होते आणि शोपियानमधील छोटीपोरा येथील त्याचे घरही सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केले

कुट्टे हा लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी ग्रुप टीआरएफचा एक मोठा कमांडर होता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात त्याची मोठी भूमिका होती.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मंगळवारी सकाळी कुलगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली, त्यानंतर दहशतवादी शोपियानला पळून गेले. पण सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला आणि शोपियान येथे पोहोचले आणि तेथे दहशतवाद्यांना घेरले. यादरम्यान, स्वतःला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

कुट्टे कोण होता?

शोपियान आणि आसपासच्या भागात झालेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये कुट्टेचा सहभाग असल्याचे मानले जाते. तो लष्कर-ए-तैयबासाठी भरती, प्रशिक्षण आणि ऑपरेशन्सचे समन्वय साधण्यात सक्रिय होता. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या मते, तो अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये भरती करण्यातही सहभागी होता.