103 कोटीचा घोटाळ्यात मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ; CBIचा ‘क्लोजर रिपोर्ट’ फेटाळला प्रकरण काय?

0

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियातील १०३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

सीबीआयने त्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने फेटाळला असून संबंधित प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले आहे. प्रकरण नव्याने ऐकण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. प्रकरण पुन्हा नव्याने ऐकले जाणार असल्याने कंबोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. कंपनी आणि तिच्या संचालकांवर खटला चालवण्यासाठी पुरेशा पुराव्यांचा अभाव असल्याने सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली असून दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट (प्रकरण बंद करण्यासाठीचा अहवाल) सादर केला.

मात्र दंडाधिकाऱ्यांनी तो अहवाल फेटाळून लावला. त्या निर्णयाला सीबीआयने सत्र न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सीबीआयचे अपील योग्य ठरवत प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा सीबीआयचा अहवाल फेटाळण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.