आजवर ईडीच्या ६००० केसेस २५ प्रकरणांत तथ्य; फक्त दोघांना शिक्षा अन् ४०४ कोटी खर्च : शरद पवार

0
1

राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नावं हे अजित पवार गटाला दिलं. दरम्यान, अजित पवार अनेकदा राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असं सांगतात. मात्र, आज शरद पवारांनी त्यांच्या त्या वक्तव्यावर बोलत अजित पवारांना टोला लगावला आहे.

‘काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असं सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक आहे, अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

‘तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा. महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही,’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ईडी कारवाईबाबत काय म्हणाले शरद पवार?

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आज देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ED हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ED हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला.

२०१४ ते २०२३ या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवल्या गेल्या. चौकशीनंतर त्यापैकी केवळ २५ प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या २५ पैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास ४०४ कोटी रुपये खर्च झाले, असंही शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे