नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवणार, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर दिली धमकी,14 अन् 18 मे रोजी हे होणार सामने

0
5

 इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 दरम्यान पाकिस्तानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने दिलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) अधिकृत इमेलवर धमकीचा मेल आला आहे. यामध्ये लिहिलंय की, आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून टाकू. हा मेल पाकिस्तानच्या नावाने पाठवण्यात आला आहे. यानंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या असून या गंभीर प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर लगेच ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे याप्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) चे दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. हे पाहता स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुजरात पोलीस आणि सायबर क्राईम टीमने तातडीनं कारवाई करत इमेलच्या सोर्सचा तपास केला जात आहे. इमेलचं ट्रेसिंग केलं जात आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे इमेल कोणी आणि कुठून पाठवला आहे, हे माहित होईल.

GCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ते सतत पोलीस आणि सुरक्षा एजन्सिच्या संपर्कात आहेत. स्टेडियममधील सुरक्षा रक्षकांना याबाबत सतर्क करण्यात आलं आहे. याशिवाय बीसीसीआय आणि आयपीएलची आयोजन समितीलाही याप्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. धमकीच्या सत्यतेबाबत तपास केला जात आहे, कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी शक्य तेव्हढी तयारी केली जात आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

14 आणि 18 मे रोजी होणार सामने

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 14 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा सामना होणार आहे. तर 18 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम आहे. .या स्टेडियमची 1 लाख 32 हजार इतकी प्रेक्षक क्षमता आहे.