दहावीचा निकाल कधी? संभाव्य तारखेबाबत बोर्डाकडून आली मोठी अपडेट

0
2

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कधी लागेल, याची सर्व विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनाही उत्सुकता आहे. महाराष्ट्र बोर्ड लवकरच दहावीचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर mahahsscboard.in वर जाहीर करणार आहे. SSC निकाल2025 लिंकच्या मदतीने विद्यार्थी आपली मार्कशीट ऑनलाइन पाहू शकतात. जाणून घ्या, महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल कधी जाहीर होईल.

दहावीचा निकाल 2025 कधी लागेल?

दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात, 15 मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं बोर्डाने पूर्वी सांगितलं होतं. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

दहावीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?

महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल:

सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइटवर जा:

www.mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

वेबसाइट उघडल्यानंतर, “Maharashtra State Board, SSC Examination February 2025 Result” या विभागात View SSC Result या लिंकवर (लिंक सक्रिय झाल्यानंतर).

त्यानंतर, तुमच्यासमोर निकाल डॅशबोर्ड उघडेल.

येथे तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव (Mothers First Name) भरून View Result या बटणावर .

तुमचं एसएससी निकाल स्क्रीनवर दिसेल.

त्याचा पीडीएफ डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची खऱ्या मार्कशीट मिळत नाही.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

अकरावी प्रवेशप्रक्रिया 2025 अपडेट

शालेय शिक्षण विभागाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यभरातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.

विद्यालयांसाठी माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया 8 मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा 19 मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक माहिती भरून, 19 मेपासून ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.