महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण

0

१ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला होणार असून लोकांच्या सेवेत येणार आहे.

आनंदाची गोष्ट म्हणजे समृद्दी महामार्गाच्या तिसऱ्या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल.

एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ६२५ किलोमीटरचा महामार्ग हा या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहुर्त ठरला आहे. त्यामुळे नाशिक ते मुंबई व नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एमएसआरडीसी तर्फे उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम या अगोदरच पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र यासाठी मोठा विलंब झाला. अखेरीस इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी खुला होत आहे. 35 मीटर रुंद आणि 6 लेन दुहेरी बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठणे शक्य होणार आहे.

समृद्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या व अत्यंत आव्हानात्मक अशा टप्प्याचे लोकार्पण १ मेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

समृद्धी महामार्ग बाबत सांगायचे झाले तर हा सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे व याची रुंदी 120 मीटर इतकी आहे. या महामार्गावरून वाहने तब्बल 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकणार आहेत. तसेच या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास सुद्धा विकसित करण्यात आले आहेत.

या महामार्गावर जुळे बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन