महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अन् मार्चचा…

0

लाडक्या बहिणींसाठी सरकारनं खूशखबर दिली आहे. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे.तसंच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही ८ मार्चच्या महिलादिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करुन देणार आहोत. पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरु होईल. आत्तापर्यंत आम्ही २ कोटी ४० लाख महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. विरोधक सुरुवातीपासून याबाबत आरोप करत आहेत, ही योजना त्यांना खुपते आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून या योजनेला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळं विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य पसरलेलं आहे”

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मार्च महिन्याचा हप्ता कधी?

फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता हा सध्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बजेट सादर झाल्यानंतर अर्थ खात्याकडून जेव्हा या योजनेसाठीचं बजेट उपलब्ध करुन दिलं जाईल, त्यानंतर मार्चचा हप्ता खात्यात वर्ग केला जाणार आहे.