वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये शिवभक्तांचा महापूर…  महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

0

तमाम कोथरूडवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये गेली दोन दिवस महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजल्यापासून शंभू महादेवाच्या लघुरुद्र अभिषेकाला सुरुवात झाली. आळंदी येथील वारकऱ्यांच्या साथीने व वनाझ

परिवार भजनी मंडळाच्या साथीने सकाळी ९ वाजता पालखी ला शिव मंदिरातून सुरुवात करून आझाद नगर गुजरात कॉलनी वनाझ कॉर्नर पौड रोड मार्गे पुन्हा वनाझ परिवारामध्ये अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंदिर आणि परिसरामध्ये केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले. मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये देखील सुंदर सजावट करण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ९ वाजता ह भ प यशवंत महाराज फाले यांचे काल्याचे किर्तन पार पडले तर ११ वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. कोथरूड आणि परिसरातील सुमारे ५००० भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दिवसेंदिवस वनाझ परिवार शिव मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या पत्नी सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, कोथरूड पोलीस स्टेशनचे एपीआय बालाजी सानप साहेब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या उत्सवाला आवर्जून उपस्थित होते. समस्त वनाझ परिवारातील असंख्य महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांच्या सहकार्याने हा महाशिवरातील उत्सव यशस्वीरित्या पार पडला अशी माहिती वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांनी दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रतिष्ठानचे उत्सव प्रमुख युवराज गायकवाड,कार्याध्यक्ष दीपक कुल, सचिव विकास जाधव, जनार्दन सातपुते, बाबासाहेब गायकवाड, मिलिंद देशपांडे, यतिन घरत, विशाल उभे, महेश यादव,श्याम सुर्वे,विकास पंदिरे,संतोष बाईत ,महेश कांबळे‌ आणि सल्लागार विनायक पवार, केदार घाटे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री उत्सव यशस्वी करण्यात आला.