वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी भारतातील संगणक विज्ञान शिक्षणात क्रांतीसाठी सज्ज

0

 

पुणे: वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (SOT) एक प्रीमियर अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम लॉन्च करत आहे, जो भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे पारंपरिक नियम बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.  उद्योगसज्ज पदवीधर घडवण्यावर भर देणाऱ्या वेदमचा अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने तयार केला गेला आहे आणि पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. विद्यार्थी यूजीसी-मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी.टेक इन कंप्युटर सायन्स ही पदवी मिळवतील.

“कोडिंग पहिल्याच दिवसापासून सुरू होते” या तत्त्वावर आधारलेले वेदम पारंपरिक संकल्पनांपासून वेगळा दृष्टिकोन स्वीकारतो आणि वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण करण्यावर भर देतो. विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमात 1,00,000 हून अधिक ओळींचे कोडिंग करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते 2029 आणि त्यापलीकडील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुसज्ज होतील.वेदमच्या नेतृत्वानुसार, संस्थेचे ध्येय कठोर कोडिंग अभ्यासक्रम आणि उद्योगातील आघाडीच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन यांच्या मदतीने समस्या सोडवणारे आणि नवप्रवर्तक घडवणे हे आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

“वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही भारतातील संगणक विज्ञान शिक्षणासाठी एक नवीन मापदंड निश्चित करू इच्छितो. कठोर, व्यावहारिक कोडिंग अभ्यासक्रम आणि उद्योगातील दिग्गजांकडून मार्गदर्शन यांच्या संयोगाने, आम्ही विद्यार्थ्यांना नवप्रवर्तन व उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सज्ज करत आहोत. आमचा भर भविष्यातील तंत्रज्ञान घडवणाऱ्या समस्यासोधक पिढीच्या जडणघडणीवर आहे,” असे पीयूष नांग्रू, सह-संस्थापक आणि सीओओ, वेदम यांनी सांगितले.

सर्जनशीलता आणि नाविन्य वाढवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा वेदम SOT विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परिसर उपलब्ध करून देतो, जिथे सर्जनशीलता, सहयोग आणि नाविन्याला चालना मिळते. संस्थेच्या सुविधांमध्ये समाविष्ट आहे:

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

प्रेरणादायी वर्गखोल्या – सहयोग आणि सर्जनशील विचारांना चालना देण्यासाठी

ब्रेकआउट लॅब्स – प्रत्यक्ष प्रयोगांसाठी

कोडिंग डेन्स – सखोल विचार व कोडिंग मॅरेथॉनसाठी

हँगआउट क्षेत्रे – विद्यार्थी-विद्यार्थी शिकण्यास आणि नेटवर्किंगसाठी

Apple MacBooks – प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट कोडिंग अनुभव देण्यासाठी

ही संस्था केवळ टॉप ५% अर्जदारांना निवडते, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रतिस्पर्धात्मक पण सहयोगी वातावरणात शिकण्याचा अनुभव मिळेल.

जागतिक संधी आणि उद्योगसज्जता

वर्गातील शिक्षणापलीकडे, वेदम विद्यार्थ्यांना Google Summer of Code, आंतरराष्ट्रीय टेक कॉन्फरन्स आणि ग्लोबल हॅकाथॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी देते. उच्च दर्जाच्या प्लेसमेंट तयारीवर भर असल्याने, विद्यार्थी जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळवू शकतील.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी भारताच्या तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करण्यास सज्ज आहे. नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि उद्योग-केंद्रित शिकवणीच्या मदतीने, पुढील पिढीचे नवप्रवर्तक आणि तंत्रज्ञान नेते घडवण्याचे वेदमचे उद्दिष्ट आहे.

उद्योजकांची पुढाकार घेतलेली संस्था वेदम स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी ही आशिष मुञ्जाल, पीयूष नांग्रू आणि अंकुर जैन या अनुभवी उद्योजकांनी स्थापन केली आहे. Series C फंडिंग प्राप्त उच्च शिक्षण क्षेत्रातील एका कंपनीचे ६ वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वीपणे संचालन केल्यानंतर, ज्यामध्ये १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यांनी वेदमच्या माध्यमातून भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे भविष्य बदलण्याचा संकल्प केला आहे.