महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात सध्या नव्या तंत्रज्ञान प्रणालीच्या (HSRP) नंबर प्लेट शक्तीच्या करण्यात आले असून आगामी काळामध्ये यामध्ये कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन या संबंधित निर्णयातून सर्वसामान्य रिक्षा चालकांना तात्काळ सक्ती लागू न करता नियमित सक्षमता (फिटनेस) प्रमाणपत्राच्या वेळेस नंबर प्लेट बदलण्याची मुभा देत दिलासा द्यावा. अशी मागणी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे यांच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन आदेशान्वये HSRP नंबर प्लेट सर्वच प्रकारच्या वाहनांना सक्तीने बसविण्यात यावी असे आदेश काढण्यात आलेले आहेत,आमची आपणास या पत्राद्वारे अशी विनंती आहे की या सक्ती मधून रिक्षा वगळण्यात यावी. कारण ओला उबेर रॅपिडो यासारख्या बेकायदेशीर मोबाईल ॲपमुळे तसेच मेट्रो व इतर बेकादेशीर वाहनातून होणारी प्रवासी वाहतूक, वाढती महागाई, रस्त्याला असणारी प्रचंड गर्दी ,खराब रस्ते या सर्व गोष्टींमुळे रिक्षा व्यवसायिक प्रचंड अडचणीत आलेला आहे. दैनंदिन धंद्याची परिस्थिती 50% पेक्षा खाली आलेली असून HSRP नंबर प्लेटचे दर इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने अवाच्या सव्वा आकारलेले आहे.
सत्य व वास्तव परिस्थितीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून HSRP नंबर प्लेटची सक्ती रिक्षासाठी वगळण्यात यावी अन्यथा पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र येऊन परिवहन आयुक्तांना घेराव घालण्याचा इशाराही यावेळी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.