कोलेस्ट्रॉल डायबिटीज ८४ औषधं ‘नॉन-स्टँडर्ड क्वालिटी’ या कॅटेगिरीत गुणवत्ता चाचणीत अपयशी, शासन अलर्ट जारी

0

देशभरात औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनी केलेल्या औषधांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात धक्कादायक बाब पुढे आली आहे. गॅस, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजसाठी दिली जाणारी तब्बल ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्याचं या अहवालात सांगण्यात आले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार विविध कंपन्यांची ८४ औषधं गुणवत्तेच्या निकषावर अपयशी ठरली आहेत. यामध्ये गॅस, उच्च कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. या औषधांना ‘नॉन-स्टँडर्ड क्वालिटी’ या कॅटेगिरीत ठेवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे नियमितपणे बाजारातील औषधांची तपासणी केली जाते आहे. बाजारातून निकृष्ट आणि बनावट औषधं हद्दपार करणे आणि या औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम टाळणं हा या मागचा उद्देश आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने नुकताच काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. त्यानुसार, प्रत्येक ड्रग इन्स्पेक्टरला महिन्याला किमान १० औषधांची तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ही औषधं त्याच दिवशी प्रयोगशाळेत पाठवावे असे निर्देशही देण्यात आलं आहेत.

बाजारातील औषधांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या या निर्णयामुळे औषध उद्योगात पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधं मिळतील असा विश्वासही व्यक्त केला जातो आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार