पुणे शहर पोलीस दलातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये मुख्यत्वे वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या शहरातील पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने चर्चा सुरू आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव 23 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असेही आदेशात म्हटलं आहे.
बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि ठिकाणे
1) सावळाराम पुरषोत्तम साळगावकर (वपोनि भारती विद्यापीठ पोलीस ठाणे)
2) राहुल विरसिंग गौड (वपोनि सहकारनगर पोलीस ठाणे)
3) संजय नागोराव मोगले (वपोनि हडपसर पोलीस ठाणे)
4) सुनिल गजानन थोपटे(वपोनि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे)
5) दिलीप मगन फुलपगारे (वपोनि खडकी पोलीस ठाणे)
6) सीमा सुधीरकुमार ढाकणे (वपोनि चंदन नगर पोलीस ठाणे)
7) मनिषा हेमंत पाटील (वपोनि मार्केट यार्ड पोलीस ठाणे)
8) राजेंद्र भाऊराव पन्हाळे (वपोनि लोणी काळभोर पोलीस ठाणे)
9) सत्यजित बाळकृष्ण आदमाने (वपोनि वानवडी पोलीस ठाणे)
10) नरेंद्र शामराव मोरे (वाहतूक शाखा)
11) सुरेश तुकाराम शिंदे (वाहतूक शाखा)
12) रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (वाहतूक शाखा)
13) संगीता सुनिल जाधव (वाहतूक शाखा)
14) राजेंद्र हनमंतु करणकोट (वाहतूक शाखा)
15) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (वपोनि सायबर पोलीस ठाणे)
16) दशरथ शिवाजी पाटील (विशेष शाखा)
17) सतिश हणमंत जगदाळे (विशेष शाखा)
18) गुरदत्त गोरखनाथ मोरे (विशेष शाखा)
19) माया दौलतराव देवरे (गुन्हे शाखा)
20) संतोष लक्ष्मण पांढरे (गुन्हे शाखा)
21) संजय जीवन पतंगे (गुन्हे शाखा)
22) छगन शंकर कापसे (गुन्हे शाखा)
23) संतोष उत्तमराव पाटील (मनपा अतिक्रमण विभाग)
लोणी काळभोर गुन्हेगारीलाही आता चाप बसणार का?
राजेंद्र पन्हाळे यांची शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख आहे. आपल्या ‘सिंघम’ स्टाईल कामांनी ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाही आता चाप बसणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.