‘शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण…’ अमित शाहांचं सूचक विधान

0

‘एकनाथ शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. 2019 मध्ये देखील आमच्या भरपूर जागा होत्या. परंतु तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलेलं.’ असं मोठं आणि अत्यंत सूचक असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. या विशेष कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी हे विधान केलं आहे.

 

प्रश्न: महाराष्ट्रात हा विजय कसा मिळवला?

 

अमित शाह: ‘2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना जा जागांवर लढली तिथे आमचे उमेदवार नव्हते. आम्ही तिथे लढलो नव्हतो तर आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्यासोबत तर आमच्या युतीला संपूर्ण बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्री बनण्याची लालच यामुळे उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला. फक्त आमच्याशीच नव्हे तर महाराष्ट्राने जो जनादेश दिला होता त्याचाशीही विश्वासघात केला होता.’

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

‘त्यावेळी देखील आम्हाला 2/3 बहुमत होतं आणि आजही आम्हाला 2/3 बहुमत आहे. त्यावेळी आमच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विश्वासघात केला होता. जनतेने ती गोष्ट लक्षात ठेवली आणि त्यानंतर आमचं जे अडीच वर्ष सरकार होतं. त्यात आम्ही जी विकासाची कामं केली. याशिवाय मोदी सरकारचा 10 वर्षाचा चांगला कारभार हे देखील आमच्यासाठी जमेची बाजू होती. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आमचा प्रचंड विजय झालेला आहे.’

प्रश्न: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडेसे नाराज आहेत? तुम्ही त्यांचा चेहरा दाखवला लाडकी बहीण योजना आणल्या

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अमित शाह: ‘हे बघा.. आपल्या लोकांचं कारण आहे की, नाराजी शोधत राहणं. शिंदेंनी नाराज होण्याचं काही कारणच नाही. आमच्या खूप जास्त जागा आहेत. 2019 मध्ये देखील आमच्या भरपूर जागा होत्या. परंतु तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलेलं. अडीच वर्ष संपूर्ण विश्वासाने आम्ही विश्वासाने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलो.’

‘यंदा आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो होतो की, मुख्यमंत्री कोण होईल हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल. यासाठी कोणालाही नाराजी ठेवण्याची काही गरजही नाही आणि कोणी तशी नाराजी ठेवत देखील नाही.’

प्रश्न: तुम्हाला मंत्रिमंडळ, खाते वाटपात अडचणी येत असतील ना?

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अमित शाह: ‘मंत्रिमंडळ वाटपात कोणतीही अडचण नाही. आम्ही जसं ठरवलं आहे त्याप्रमाणे आमचा सगळा कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्रात पहिले आघाडीचं सरकार होतं. त्या सरकारपेक्षा आम्ही 3-3 दिवस पुढेच आहोत.’ असं अमित शाह यावेळी म्हणाले.