साहेबांना वाढदिवस शुभेच्छा देण्यास अजितदादा दिल्लीच्या घरी; सुप्रिया सुळेंकडून दादांचे खास स्वागत वीस मिनिटे चर्चा

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पppवारांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळेंनी अजितदादांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांच्या सोबत सुनित्रा पवार, पार्थ पवार, अजित पवार गटाचे, प्रफुल्ल नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. पक्षफुटीनंतर काका-पुतण्याची ही पहिलीची भेट असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1867039630694158507?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1867039630694158507%7Ctwgr%5E728e26b1f0d5d76e81e285ea35c519ead32ec323%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

शरद पवार यांच्यावर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” अशा शुभेच्छा अजित पवार यांनी एक्स पोस्टमधून दिल्या आहेत.