मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? …असं तपासा पैसे कधी खात्यात येणारं

0

महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुती आघाडीला पुन्हा प्रचंड असं बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यातच महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.

कारण आता माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना केवळ आर्थिक लाभच मिळत नाही. तर, त्याची रक्कम देखील वाढू शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होत्या. आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे योजनेचा 6 वा हप्ताही लवकरच जारी केला जाऊ शकतो. माझी लाडकी बहीन योजनेचा पुढचा हप्ता कधी निघेल याबाबत आता आपण जाणून घेऊया.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतात लाडक्या बहिणीचे पैसे

माझी लाडकी बहीण योजना ही या वर्षी जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू झाली. ज्यामध्ये 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांना या शासकीय योजनेचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते सरकारने महिलांना पाठवले आहेत. आता महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महाराष्ट्रात जारी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रात 5 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचा पुढील हप्ता जारी केला जाऊ शकतो.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

असं तपासा स्टेट्स

तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेतील तुमच्या हप्त्याचं स्टेट्स पाहायचं असल्यास त्यामुळे तुम्ही घरबसल्या ऑनलाइन स्टेट्स तपासू शकता. या कामासाठी, सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://testmmmlby.mahaitgov.in/ या लिंकवर जावे लागेल. यानंतर, Aapro होम पेजवर लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला खाली लाभार्थ्यांचं स्टेट्स दिसेल.