महायुती 2.0 राष्ट्रवादीत कोणाला मंत्रीपद? 12 संभाव्य नावावर चर्चा, 7 ते 8 नावे आजच अमित शाह यांच्याकडे दिली जाणार

0
1

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. येत्या 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार? मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 संभाव्य मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 7 ते 8 नावे आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहेत.

अजित पवारांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पटेलांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरु

प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीला पक्षाध्यक्ष अजित पवार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित आहेत. तसेच या बैठकीला पार्थ पवार देखील उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ शपथविधी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे