‘स्त्री 2’ दिग्दर्शक पडद्यावर घेऊन येणार Vampire Love Story; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

0
4

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या क्रिएटीव्हिटीची सगळीकडे चर्चा सुरु असतानाच आता ते आणखी एक हॉरर कॉमेडी यूनिव्हर्सची एक नवी लव्ह स्टोरी घेऊन येत आहेत. आता नक्की काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात कलाकार कोण असणार आहे याची चर्चा सुरु असताना आताच एक छोटी क्लिप शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे इतकंच नाही तर सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या प्रोमो व्हिडीओमध्ये चित्रपटाचं नाव, कोणते कलाकार यात पाहायला मिळणार आणि पटकथा कशावर आधारीत असणार याविषयी थोडी कल्पना दिली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना, परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय पुढे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख देखील सांगितली आहे. या चित्रपटाचं नाव Thama असं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात 2025 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आतापासून दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माते या चित्रपटाच्या तयारीत लागले आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये उस्तुकता वाढली आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

चित्रपटाच्या घोषणेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘स्त्री-2 पाहिल्यानंतर आता या चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे काही तरी कमाल पाहायला मिळणार आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘वॅम्पायर लव्ह स्टोरी आहे ही ज्याची बॉलिवूडला आवश्यकता होती.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हे काही तरी नवीन करण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे. यामुळे प्रेक्षक हे थिएटर्सकडे येतील.’ दुसरा नेटकरी म्हणाला, अखेर ज्याची प्रतीक्षा करत होतो ते आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, प्रेक्षकांना मिळालेलं सगळ्यात चांगलं दिवाळी गिफ्ट आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

खरंतर, ‘स्त्री 2’ च्या यशानंतर आणि त्या चित्रपटाची पटकथा आवडल्यानंतर आता प्रेक्षकांना दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या या आगामी प्रोजेक्टविषयी खूप उत्सुकता लागली आहे.